सोनाई विषयी
भारतात दुग्ध उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच सोनाई. सोनाईची स्थापना श्री. दशरथ (दादा) माने यांनी २००२ मध्ये केली. सोनाई ने सुरवातीला ग्राहकांच्या दारी शुद्ध दूध पोहोचवण्यापासून सुरुवात केली. कालांतराने २०१४ मध्ये सोनाई कॅटल फीड प्रा. लि. ची स्थापना करून जनावरांच्या खाद्यनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये विस्तार केला. गायी आणि म्हशींसाठी बनवलेल्या पौष्टिक खाद्यपूरवठ्यात आम्ही आज उच्च स्थानी आहोत.
दुग्धलक्ष्मी, दूग्धशक्ती, एक्स्ट्रा मिल्क, सुपर डायमंड, प्राईम, दुग्धपूर्णा, बफेलो स्पेशल, ट्रान्झी प्लस, गर्भ संपूर्ण, आणि पोषक असे आमचे ब्रँड वेगवेगळ्या वयोगटांना आणि दुग्ध उत्पादनाच्या क्षमतेनुसार सेवा देतात. सोनाई ग्रुपमध्ये, आम्ही जनावरांचे आरोग्य, जास्त दूध उत्पादन तसेच दुधाच्या गुणवत्तेला प्राथमिकता देतो.
सोनाई पशु आहाराची वैशिष्ट्ये म्हणजे
१.दुधामध्ये वाढीव फॅट व एस.एन.एफ. व प्रोटीन.
२.जनावरांचा भाकड काळ कमी होण्यासाठी पशुखाद्यामध्ये परिपूर्ण घटकांचा समावेश.
३.उच्च दर्जाच्या मेडिसीनचा वापर.
४.परिपूर्ण घटकांमुळे जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
५.जनावरांची प्रजनन क्षमता सुरळित होते.
आमची दृष्टी
दुधाला उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत बनवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला सशक्त बनवणे आणि गायी आणि म्हशींच्या माध्यमातून दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा करणे.
मिशन
गुणवत्तापूर्ण पशु आहार तयार करणे आणि दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढवणे तसेच जनावरांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला सहयोग करणे.
व्हिजन
शेतकऱ्यांची समृध्दी केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनाच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे. गायी आणि म्हशींच्या दुधाचा आणि दुग्ध पदार्थांचा पुरवठा करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणे.
आमचे मिशन
दर्जेदार पशुखाद्य तयार करणे त्यामुळे दुधाचे प्रमाण, गुणवत्ता वाढवणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत करणे.
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
मी, दशरथ श्रीरंग माने, सोनाईच्या यशात महत्वाची भूमिका बजावण्यास भाग्यवान आहे. परंतु, दुध व्यापाऱ्यांसाठी मूल्य वाढवण्यासाठी, ग्राहकांसाठी उत्तम पोषण सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम करणार्या आमच्या समर्पित सहकाऱ्यांशिवाय हे शक्य झाले नसते. ते आमच्या संस्थेचा खरा कणा आहेत. तसेच, प्रत्येक व्यवसायाला, त्याचा आकार कितीही असला तरी, स्पष्ट ध्येय, सुस्पष्ट मिशन आणि अढळ शिस्त लागते. भारतीय सैन्यातील माझ्या सात वर्षांच्या कारकीर्दीने माझ्यामध्ये 'कधीही हार न मानण्याचा' आत्मा निर्माण केला, ज्याने टीम सोनाईला आकार देण्यात आणि त्यांचे संगोपन करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
आमची गुणवत्ता
शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवून पशु आहार तयार करण्याच्या उद्योगात सोनाई आज अव्वल स्थानावर आहे, ग्राहकांकडून येणाऱ्या प्रतिसादामधून आमची गुणवत्ता आणि अतूट बांधिलकी स्पष्ट होते. नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आमची गुणवत्ता अशीच उत्कृष्ठ ठेवण्याचा विश्वास आम्ही व्यक्त करतो.
उत्कृष्टतेसाठी वचनबद्धता
नवनवीन फॉर्म्युलेशन्स
गुणवत्तेची हमी
तज्ज्ञता आणि अनुभव
व्यवस्थापन
श्री. किशोर माने
व्यवस्थापकीय संचालक
श्री. हरिश्चंद्र माने
संचालक
श्री. प्रविण माने
संचालक
सौ. मयुरी माने
संचालक