आमचा प्लांट
२००२ पासून दुग्धउत्पादकांना सहयोग
लहरी निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी बांधवांना प्रत्येक वेळी योग्य आर्थिक उत्पन्न मिळतेच असे नाही. अशावेळी शेतकऱ्यांसाठी निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांची समृद्धी केंद्रस्थानी मानून काम करणारा सोनाई ग्रुप. याच सोनाई ग्रुपद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी देणारा, दुग्ध व्यवसाय गुणवत्तापूर्ण पशुखाद्याची जोड देऊन जोमाने करता यावा, याकरिता २०१४ पासून पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या अत्याधुनिक संपूर्ण स्वयंचलित प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. ज्या प्रमाणात पशुखाद्याची गुणवत्ता चांगली त्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण व वाढीव दूध निर्मिती होते. उच्च प्रतीच्या कच्च्या मालापासून व सातत्यपूर्ण गुणवत्तेसह पशुखाद्य निर्मीतीमध्ये प्रत्येक टप्प्यांवर अचूक नियोजन केले जाते. भरघोस दुग्ध उत्पादन आणि दर्जेदार गुणवत्ता असणाऱ्या पशुखाद्याची सोनाईद्वारे प्रतिदिन ११०० मे. टन निर्मिती येथे केली जाते.
महाराष्ट्रामध्ये दुग्ध उत्पादन वाढीमध्ये सोनाई पशुखाद्य नंबर एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पशुखाद्याची गुणवत्ता व दूध उत्पादनात होणारी वाढ ही शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी महत्वाचा घटक मानून सोनाई काम करीत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती आणि देशातील ग्राहकांना दर्जेदार उत्पादनांद्वारे सोनाई अविरतपणे सेवा देत आहे.
सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये कठोर आणि बहुस्तरीय परीक्षण पार करून सोनाईच्या पशु आहार उत्पादनांनी बी.आय.एस. इंडियाची प्रमाणपत्रे मिळवली आहेत. याशिवाय, सोनाई ही ISO 9001:2015 प्रमाणित कंपनी आहे, जी ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने पुरवण्यास वचनबद्ध आहे.